Type Here to Get Search Results !

*हेडलाईन: पोलिसांचा खोटेपणा उघड! २३ वर्षांचा तरुण १० वर्षे जेलमध्ये; पुणे कोर्टाचा PSIच्या पगारातून दंड वसुलीचा आदेश*


*पुणे, दि. २:* खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याचे श्रेय मिळवण्यासाठी निरपराध तरुणाला अडकवल्याचा धक्कादायक प्रकार पुणे सत्र न्यायालयाने उघडकीस आणला आहे. 

*न्यायालयाचे ताशेरे:*

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी तपास अधिकारी PI संदीप विलासराव जगताप यांच्यावर तीव्र ताशेरे ओढले. बनावट आणि फेरफार केलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करून तरुणाला अडकवल्याचे न्यायालयाने नोंदवले आहे. 

*प्रकरण काय?*

२६ नोव्हेंबर २०१६ रोजी वारजे माळवाडी हद्दीत सर्जेराव क्षीरसागर बेपत्ता झाले, त्यांचा मृतदेह गोदामात सापडला. पोलिसांनी फजलू चौहान याला ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अटक केली. मृताचा मोबाईल आरोपीच्या खिशात सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. 

या प्रकरणात २३ वर्षांचा तरुण तब्बल १० वर्षे येरवडा कारागृहात होता. अखेर न्यायालयाने त्याची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

*मोठा आदेश:* तरुणाला झालेल्या बेकायदा कारावासाबद्दल नुकसानभरपाईची रक्कम PI जगताप यांच्या पगारातून वसूल करण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सातारा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. 

Post a Comment

0 Comments