Type Here to Get Search Results !

*अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाले, मुंबई पोलिसांना*



*मुंबई, २ ऑक्टोबर:* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत शिवाजी पार्क येथे CJP चा मोर्चा होणार असताना संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

*दिपके म्हणाले:* "मला मरीन ड्राईव्हवर 'चहा घेऊ' म्हणत पोलीस ठाण्यात नेलं, पण चहा दिलाच नाही! फक्त वेळ वाया घालवण्यासाठी हे नाटक केलं." 

त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, महिला पोलीस अधिकाऱ्याने "चला चहा घेऊ" असे सांगून गाडीत बसवून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेल्याचे दिसते.

*मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण:* "ना चहासाठी बोलावले, ना ताब्यात घेतले. दिपके सायंकाळी ५ वाजता मरीन ड्राईव्हवर लोकांना भेटत होते, प्रश्न विचारत होते, माहिती घेण्यासाठी बोलावले होते." 

CJP ने अटकेची बातमी फेक असल्याचे सांगत, "ज्ञानेश कुमारांच्या पारदर्शक निवडणुकीइतकीच ही बातमी खोटारडी आहे" असा टोला लगावला आहे.

आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आता दिपके यांनी 'जेल भरो'चा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments