*मुंबई:* लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, *प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा तब्बल ३ वर्षांचा संपूर्ण खर्च भागवेल एवढा इमर्जन्सी फंड तयार करावा.*
*त्यांचे ३ मोठे सल्ले:*
1. नवीन कर्ज घेऊ नका, विशेषतः घर खरेदी किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक टाळा
2. दीर्घकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला अडकवू नका
3. उत्पन्न सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करा
ते म्हणाले, *"मी काही नॉस्ट्राडेमस नाही, गेल्या दोन वर्षांपासून जाणवतंय म्हणून सावध करतोय. आभाळ कोसळणार आहे असं नाही, पण तयारी ठेवली तर कठीण काळात आर्थिक आणि भावनिक आधार मिळेल."*
या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, मध्यमवर्गीयांसाठी ३ वर्षांचा फंड व्यवहार्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Post a Comment
0 Comments