गोदावरी टाइम्स - दिल्लीतून ब्रेकिंग | L. मुरुगन
नवी दिल्ली | १३ ऑक्टोबर २०२६, संध्या ६:०९ PM | गोदावरी टाइम्स
केंद्रातील मोदी सरकारमधून सर्वात मोठी बातमी! माहिती व प्रसारण आणि संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री L. मुरुगन यांनी आज एकाच दिवशी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून आणि राज्यसभेच्या खासदारकीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
X वर पोस्ट करत म्हणाले...
L. मुरुगन यांनी X वर भावनिक पोस्ट करत राजीनाम्याची घोषणा केली:
"भारत माता आणि तामिळनाडूची सेवा करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. रोजंदारी मजुराच्या मुलापासून केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंतचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे शक्य झाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गौरव होता. आता मला तळागाळात परतायचे आहे, कार्यकर्त्यांसोबत उभे राहायचे आहे आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तामिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे."
मुरुगन पहिल्यांदा २०२१ मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते, आणि नंतर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातून त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
राजीनाम्यामागे कारण काय?
सूत्रांनुसार, तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणूक आणि २०२९ लोकसभा मिशनसाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. L. मुरुगन हे मूळ तामिळनाडूचे आहेत आणि माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना आता पूर्णवेळ संघटनेचे काम दिले जाणार आहे. त्यांनीच स्वतः सांगितले - "मला ग्रासरूटवर काम करायचे आहे."
दरम्यान, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments