Type Here to Get Search Results !

*हेडलाईन: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील नेत्यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी लिस्टेड झाली होऊ शकली नाही, समोर आली अशी कारणे*

 *गोदावरी टाइम्स - दिल्लीतून मोठी बातमी | राहुल गांधी याचिका*



*नवी दिल्ली | १३ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स*


विरोधकांसाठी मोठा झटका! काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या ११ नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी लिस्ट होऊ शकली नाही. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने या याचिकेत तब्बल *१४ त्रुटी (Defects)* काढल्या आहेत.


*याचिका लिस्ट का झाली नाही? १४ त्रुटी समोर*


सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीने १२ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या *Diary No. 64196/2026 (Rahul Gandhi Vs Election Commission of India)* या याचिकेवर आक्षेप घेतले आहेत.


*रजिस्ट्रीने काढलेल्या प्रमुख त्रुटी:*


*१) ₹ २२० कोर्ट फी कमी:* कोर्ट फी भरण्यात २२० रुपयांची कमतरता आहे.

*२) खरगे यांच्या ID ची झेरॉक्स अस्पष्ट:* काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ओळखपत्राची प्रत धूसर (Blurred) आहे.

*३) ९ नेत्यांचे वकिलपत्र नाही:* सौगत रॉय, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, संजय राऊत, एम.ए. बेबी, डी. राजा, महुआ माजी, सुप्रिया सुळे आणि ई.टी. मोहम्मद बशीर या ९ याचिकाकर्त्यांचे स्वाक्षरी केलेले वकिलपत्र (Vakalatnama) जोडलेले नाही.

*४) व्यक्तींना आरोपी बनवले:* निवडणूक आयोग ही संस्था असताना CEC *ज्ञानेश कुमार* आणि दोन आयुक्त *सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी* यांना वैयक्तिकरित्या प्रतिवादी बनवण्याचे कारण स्पष्ट केले नाही.

*५) जुन्या निकालाची प्रत नाही आणि डॉक्युमेंट्सची छपाई चुकीची:* याचिकेसोबत जुन्या निकालाची प्रत जोडलेली नाही, तसेच अनेक पाने लहान फॉन्टमध्ये आणि वाचता न येण्यासारखी आहेत.


रजिस्ट्रीने स्पष्ट केले - *"जोपर्यंत या १४ त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत ही याचिका सुनावणीसाठी लिस्ट केली जाणार नाही."*


*कोण आहेत ११ याचिकाकर्ते?*


ही याचिका राहुल गांधी यांनी एकट्याने नाही, तर इंडिया आघाडीच्या ११ नेत्यांनी मिळून दाखल केली होती:

राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सौगत रॉय (TMC), अखिलेश यादव (SP), तेजस्वी यादव (RJD), संजय राऊत (शिवसेना UBT), एम.ए. बेबी (CPM), डी. राजा (CPI), महुआ माजी (JMM), सुप्रिया सुळे (NCP-SP) आणि ई.टी. बशीर (IUML).


वकील *एस. प्रसन्ना* यांच्यामार्फत ही याचिका १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ४:३७ वाजता दाखल करण्यात आली होती.


या याचिकेत निवडणूक आयोगाच्या *Special Intensive Revision (SIR)* मधील मतदार वगळण्याच्या घोळाची चौकशी आणि CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.


सध्या काँग्रेसची लीगल टीम या त्रुटी दूर करण्याचे काम करत आहे. त्रुटी दूर झाल्यानंतरच ही याचिका पुन्हा लिस्ट होईल.


Post a Comment

0 Comments