गोदावरी टाइम्स - अर्थ/व्यापार विशेष
नवी दिल्ली | २३ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स
केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिक, व्यापारी आणि स्टार्टअपसाठी दिवाळी गिफ्ट दिले आहे. १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झालेल्या GST 2.0 सुधारणांनुसार GST रजिस्ट्रेशनपासून रिफंडपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया बदलणार असून, त्याचा थेट फायदा ९६% नवीन अर्जदारांना होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गाजियाबाद येथील नव्या CGST भवनाच्या उद्घाटनप्रसंगी याची घोषणा केली होती.
काय आहेत नवीन नियम? - ५ मोठे बदल
१. फक्त ३ दिवसांत GST नंबर:
ज्या व्यावसायिकांची मासिक कर देयता (Output Tax - CGST+SGST+IGST मिळून) २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा 'लो-रिस्क' कॅटेगरीतील व्यावसायिकांना आता ३ कामकाजाच्या दिवसांत ऑटो-अप्रूव्हल मिळणार आहे. यासाठी GST कायद्यात नवीन Rule 9A जोडण्यात आला आहे. यापूर्वी ही प्रक्रिया १५-३० दिवस लागत होती.
२. कोणाला मिळणार फायदा?
- ज्यांचे GST रेकॉर्ड क्लीन आहे आणि डेटा अॅनालिटिक्सनुसार लो-रिस्क आहेत.
- जे स्वतः सेल्फ-डिक्लेरेशन देतील की माझी मासिक देयता २.५ लाखांपेक्षा कमी आहे.
- ही योजना पूर्णपणे ऐच्छिक (Voluntary) आहे. नंतर देयता वाढल्यास योजनेतून बाहेर पडता येईल.
३. रिफंड आता ७ दिवसांत:
निर्यातदार आणि इतर व्यावसायिकांना रिफंडसाठी महिने वाट पाहावी लागत होती. आता नवीन नियमानुसार ९०% रिफंड प्रोव्हिजनल स्वरूपात फक्त ७ दिवसांत मिळणार आहे. यामुळे MSME क्षेत्राचा कॅश फ्लो सुधारणार आहे.
४. बनावट रजिस्ट्रेशनवर वॉच:
सरकारने स्पष्ट केले आहे की, जलद मंजुरीचा अर्थ तपासणी बंद असा नाही. डेटा अॅनालिटिक्स आणि AI च्या मदतीने हाय-रिस्क आणि बनावट रजिस्ट्रेशन पकडण्यासाठी विशेष यंत्रणा राबवली जाणार आहे.
५. GST 2.0 चे इतर सुधारणा:
- दोन स्लॅब स्ट्रक्चर - ५% आणि १८%, तर लक्झरी/सिन गुड्सवर ४०%
- रिटर्न फाइलिंग अधिक सोपे
- एका पत्त्यावरून अनेक राज्यांत पुरवठा करण्याची ई-कॉमर्सना मुभा
छोट्या व्यावसायिकांची प्रतिक्रिया -
"आधी आठवडे लागत होते, आता ७२ तासांत GSTIN मिळाला" - अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. CA असोसिएशनने याला "ईमानदार करदात्यांवर विश्वास ठेवणारे मॉडेल" म्हटले आहे.
१ नोव्हेंबर २०२५ पासून ही प्रक्रिया http://gst.gov.in वर सुरू झाली असून, GSTN पोर्टलवर यासाठी विशेष हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे.
- गोदावरी टाइम्स | दिल्ली बिझनेस ब्युरो
पोस्टर्स करा

Post a Comment
0 Comments