गोदावरी टाइम्स - पुणे विभाग विशेष
पुणे | २३ ऑक्टोबर २०२६ (आज) | गोदावरी टाइम्स
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होत आहे.
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे! आपला एक मत उद्याचे धोरण ठरवणार आहे. सर्व शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाच जिल्ह्यात ४.५ लाख सुशिक्षित मतदार करणार फैसला -
पुणे विभागात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांत ही निवडणूक होत आहे.
- एकूण मतदान केंद्रे: १,०५१ केंद्रे (पदवीधरसाठी ७४१, शिक्षकसाठी ३१०)
- एकूण मतदार: ४ लाख ५० हजार १९
- पदवीधर मतदार: ३,८८,०१९ (कोल्हापुरात सर्वाधिक १,१४,५६२)
- शिक्षक मतदार: ६२,००० (पुण्यात सर्वाधिक १६,८८२)
- कर्मचारी: ६,९०० कर्मचारी, ७५० वाहने बालेवाडी मतमोजणी केंद्रासाठी सज्ज
जिल्हानिहाय केंद्रे - पुणे (२३२), सांगली (२०७), कोल्हापूर (२८२), सोलापूर (१९३), सातारा (१३७)
मतदानासाठी ११ ओळखपत्रे ग्राह्य - विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची माहिती -
फक्त मतदार ओळखपत्रच नव्हे, तर खालील ११ पैकी कोणतेही एक ओळखपत्र चालणार आहे -
१) आधार कार्ड २) ड्रायव्हिंग लायसन्स ३) पॅन कार्ड ४) पासपोर्ट ५) शासकीय/निमशासकीय सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार ओळखपत्र ७) शाळा/कॉलेजचे सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाचे मूळ पदवी प्रमाणपत्र ९) दिव्यांग प्रमाणपत्र १०) UDID कार्ड ११) EPIC कार्ड
मतदारांसाठी विशेष सुट्टी -
- शासकीय कर्मचाऱ्यांना भरपगारी विशेष नैमित्तिक रजा (Regular CL व्यतिरिक्त)
- खासगी कंपन्या, मॉल, दुकाने, कारखान्यांमधील मतदारांना ४ तासांची पगारी सुट्टी बंधनकारक. यापूर्वी २ तास होती, आता निवडणूक आयोगाने ४ तास केली आहे.
- सांगली जिल्ह्यात आज १३ ठिकाणचे शुक्रवारचे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.
लढत कशी?
राज्यात एकूण ५ जागांसाठी (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर + पुणे, अमरावती शिक्षक) १८२ उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या डॉ. स्मिता जाधव विरुद्ध शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव यांच्यात तर शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे विरुद्ध काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि शिंदे गटाचे सचिन सानप अशी चौरंगी लढत आहे.
मतमोजणी: २७ ऑक्टोबर (मंगळवार) रोजी होणार असून संपूर्ण प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल.
सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांना आवाहन - लोकशाही बळकट करण्यासाठी आज मतदान नक्की करा. वेळ - सकाळी ८ ते दुपारी ४.
- गोदावरी टाइम्स | पुणे ब्युरो

Post a Comment
0 Comments