Type Here to Get Search Results !

*FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय; मेडिक्लेमसाठी आता 24 तास हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, फक्त 2 तास पुरेसे!*

 *गोदावरी टाइम्स साठी स्पेशल बातमी*




*हॉस्पिटलकडून बिलासाठी पेशंटला त्रास दिल्यास कडक कारवाई होणार - मुंढे*


*मुंबई / प्रतिनिधी -*


सर्वसामान्य रुग्णांसाठी आणि मेडिक्लेम धारकांसाठी दिलासा देणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त *तुकाराम मुंढे* यांनी हॉस्पिटलच्या मुजोरीला चाप लावणारा कडक आदेश काढला आहे.


अनेक खाजगी हॉस्पिटल मेडिक्लेमचा क्लेम मिळवण्यासाठी रुग्णांना विनाकारण 24 तास अॅडमिट करून ठेवतात, मोठमोठी बिले लावतात. या लुटीला आता आळा बसणार आहे.


*काय आहे नवीन नियम?*


*1. 24 तासाची अट रद्द:* आता मेडिक्लेमसाठी 24 तास हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहण्याची गरज नाही. अनेक उपचार असे आहेत जे 2 तासात पूर्ण होतात. अशा उपचारांसाठी *केवळ 2 तास अॅडमिट असणे पुरेसे आहे* आणि इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम पास करावाच लागेल.


*2. बिलासाठी त्रास देऊ नका:* कोणत्याही हॉस्पिटलने बिलाच्या वसुलीसाठी पेशंटला, नातेवाईकांना दमदाटी केली, डिस्चार्ज रोखला, मृतदेह अडवून ठेवला तर तो गंभीर गुन्हा मानला जाईल.


*3. तक्रार आल्यास कडक कारवाई:* जर अशा प्रकारे त्रास दिल्याची तक्रार FDA कडे आली, तर संबंधित हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यापर्यंतची *कडक कारवाई होणार* असल्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.


*रुग्णांनी काय करावे?*


जर कोणतेही हॉस्पिटल तुम्हाला 24 तासाची सक्ती करत असेल किंवा बिलासाठी त्रास देत असेल तर थेट FDA च्या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयात लेखी तक्रार करा.


तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, यामुळे लाखो मेडिक्लेम धारक रुग्णांची आर्थिक लूट थांबणार आहे.


*गोदावरी टाइम्स - सामान्य जनतेचा आवाज*

Post a Comment

0 Comments