Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! बिहार विधान परिषद निवडणूक निकालात मोठा उलटफेर, भाजपला आणखी एक मोठा धक्का

 


पाटणा, दि. 29 - बिहार विधान परिषदेच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला असून भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शिक्षक मतदारसंघातील चारही विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत.

यात सर्वात मोठा धक्का पाटणा शिक्षक मतदारसंघात भाजपला बसला आहे. येथे गेल्या 30 वर्षांपासून सलग 5 वेळा विजयी होणारे भाजपचे दिग्गज नेते आणि जमीनीशी जोडलेले नेते समजले जाणारे नवल किशोर यादव यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) डॉ. संजीव कुमार यांनी त्यांना 1,057 मतांनी पराभूत केले आहे. संजीव कुमार यांना 4,487 तर यादव यांना 3,430 मते मिळाली.

8 जागांचा निकाल असा:

  • भाजप - 3 जागा: तिरहुत शिक्षक - नरेंद्र प्रसाद सिंह, कोसी पदवीधर - डॉ. एन.के. यादव (सर्वात मोठा विजय - 10,026 मतांनी), दरभंगा पदवीधर - सर्वेश कुमार
  • जदयू - 1 जागा: पाटणा पदवीधर - नीरज कुमार (चौथ्यांदा विजयी, 4,655 मतांनी)
  • आरजेडी - 1 जागा: पाटणा शिक्षक - डॉ. संजीव कुमार
  • जन सुराज पार्टी - 1 जागा: दरभंगा शिक्षक - डॉ. सुरेश प्रसाद राय (काँग्रेसचे मदन मोहन झा यांचा 324 मतांनी पराभव)
  • अपक्ष - 2 जागा: सारण शिक्षक - राहुल राज (1,815 मतांनी), तिरहुत पदवीधर - बंशीधर ब्रजवासी (9,147 मतांनी)

23 ऑक्टोबरला मतदान झाले होते. शिक्षक मतदारांनी एकाच पक्षाला कौल न देता वेगवेगळ्या पक्षांना आणि अपक्षांना निवडून दिल्याने विधान परिषदेत नवे समीकरण तयार होणार आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही 30 वर्षांचा गड कोसळल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पोस्टर करा

Post a Comment

0 Comments