Type Here to Get Search Results !

*CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या*




*गुजरात (करजन) दि. 3 ऑक्टोबर:* गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील करजन जवळ राष्ट्रीय महामार्ग NH-48 वरील जिंदाल कंपनीसमोरच्या CNG पंपावर भीषण स्फोट झाला आहे. 


1 ऑक्टोबर रोजी दुपारी कारमध्ये CNG भरत असताना अचानक टाकीचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की कारच्या मागच्या भागाचे तुकडे आणि काचा अनेक मीटरवर उडून पडल्या. जवळ उभ्या असलेल्या इतर दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. 


सुदैवाने सुरक्षा नियमांनुसार प्रवासी गाडीबाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. करजन अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे नेमके कारण तपासले जात आहे. घटनेचा CCTV VIDEO सोशल मीडियावर VIRAL झाला आहे.


*सुरक्षा टीप:* CNG भरताना नेहमी इंजिन बंद करा, गाडीबाहेर उभे राहा, मोबाईल वापरू नका.


*- गोदावरी टाइम्स*



Post a Comment

0 Comments