Type Here to Get Search Results !

*महायुती फुटली; उल्हासनगर महापालिकेतून भाजप बाहेर!*





*उल्हासनगर, दि. 3 ऑक्टोबर:* उल्हासनगर महापालिकेत महायुती फुटली आहे. शिवसेना (शिंदे गट) विरोधात भाजप आक्रमक झाला असून युतीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा आज दुपारी 3:19 वाजता करण्यात आली आहे. 

स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीमध्ये शिवसेनेने खेळी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. भाजप नगरसेवकांनी हात उंचावून याला संमती दिली आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

*- गोदावरी टाइम्स*

Post a Comment

0 Comments