Type Here to Get Search Results !

*CJPचं मुंबईत आंदोलन, अभिजित दीपकेंचा संघ आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल, गांधी-नेहरूंबद्दल काय म्हणाले?*



*मुंबई, २ ऑक्टोबर:* CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्क (गेट नं. ६) येथे आज CJP चा 'जेल भरो' आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आंदोलन होणारच, असे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना दिपके यांनी संघ आणि मोदींवर निशाणा साधला.

*ते म्हणाले:*

- "आम्ही सत्याग्रही आहोत, गांधीजी आणि आंबेडकरांच्या मार्गावर चालतो. अशा हल्ल्यांना घाबरत नाही."

- यापूर्वी जयपूरमधील NEET आंदोलनातील हल्ल्याबाबत त्यांनी "हल्लेखोर RSS चे होते, सरकारच्या विरोधात बोललो की असे हल्ले होतात" असा आरोप केला होता

- "गांधीजींच्या मारेकऱ्यांशी जोडलेल्या विचारसरणीला कोणालाही देशद्रोही म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. नथुराम गोडसे हा देशाचा पहिला देशद्रोही होता" असेही ते ANI ला म्हणाले होते.

- RSS प्रमुख मोहन भागवत यांनी Gen Z देशद्रोही नाही असे म्हटल्यानंतर दिपके म्हणाले होते, "मोहन भागवत हे भाजपचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी हाच संदेश भाजप आणि नरेंद्र मोदींना द्यावा" 

*गांधी-नेहरूंबद्दल:* "ब्रिटिशांनी गांधींना आंदोलनाची परवानगी दिली होती का? आम्ही गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याची शपथ घेतोय. मुंबईतूनच गांधींनी Quit India सुरू केले होते" असे सांगत त्यांनी आंदोलनाचे समर्थन केले.

शिवसेना (UBT) आणि आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

0 Comments