*गोदावरी टाइम्स - पुणे ब्रेकिंग | आरोग्य-शिक्षण*
*पुणे | १५ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स*
पुणेकरांसाठी आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! पुण्याला *तिसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय* मिळाले आहे. मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* यांनी स्वतः X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
*कुठे आणि किती जागा?*
- *ठिकाण:* ESIC हॉस्पिटल, बिबवेवाडी, पुणे
- *कॉलेजचे नाव:* ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पुणे
- *जागा:* ५० MBBS जागा
- *प्रवेश कधीपासून:* *शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून*
- *व्यवस्थापन:* Employees' State Insurance Corporation (ESIC) कडूनच कॉलेज चालवले जाणार
आतापर्यंत पुण्यात ससून हॉस्पिटल (BJMC) आणि महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अशी दोनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये होती. हे तिसरे ठरणार आहे.
*मुख्यमंत्री काय म्हणाले?*
"Good news for Pune and Maharashtra! Pune gets a new Medical College! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ESIC मेडिकल कॉलेजसाठी ५० MBBS जागांना मंजुरी दिली आहे. हा महाराष्ट्रासाठी नवरात्रीची भेट आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डाजी यांचे मनापासून आभार. अनेक MBBS स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल आणि महाराष्ट्राला अधिक डॉक्टर मिळतील."
*दोनदा प्रस्ताव फेटाळला, तिसऱ्यांदा मंजुरी*
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री *माधुरी मिसाळ* यांनी सांगितले की, हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी पाठवला होता, पण दोन वेळा केंद्राने फेटाळला होता. मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे ही मंजुरी मिळाली.
ESIC हॉस्पिटलचे अधिष्ठाता *डॉ. प्रदीप गायकवाड* म्हणाले, "आम्हाला मीडियातूनच मंजुरीची माहिती मिळाली, अधिकृत पत्र अजून येणे बाकी आहे."
*पुण्याला काय फायदा?*
- सध्या ESIC हॉस्पिटलमध्ये २२० बेड आहेत, १० एकर जागेवर ५०० बेडचे नवीन हॉस्पिटलही बांधकाम सुरू असून डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
- पुणे हे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णांसाठी आरोग्याचे हब आहे. नवीन कॉलेजमुळे सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट होणार.
- विद्यार्थ्यांसाठी सरकारी कोट्यातील MBBS ची संधी वाढणार.

Post a Comment
0 Comments