Type Here to Get Search Results !

हेडलाईन: अमेरिकेतील 'बिझनेस २०' साठी डॉ. नरेंद्र पाटील यांची निवड; ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

 

गोदावरी टाइम्स - पुणे | अभिमानास्पद

पुणे | १५ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स 

पुण्यातील उद्योजकांसाठी आणि पर्यायाने महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशाच्या उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील संधी जागतिक व्यासपीठावर मांडून देशासाठी कार्यरत असलेले डॉ. नरेंद्र पाटील यांची अमेरिकेत होणाऱ्या जी-२० अंतर्गत बिझनेस २० (B-20) परिषदेच्या २०२६ च्या सल्लागार मंडळावर निवड झाली आहे.


जी-२० आणि बी-२० काय आहे?

जी-२० हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा महत्त्वपूर्ण गट असून, बी-२० हा जी-२० प्रक्रियेचा संबंधित जागतिक व्यावसायिक संवाद मंच आहे. उद्योग, व्यापार, आर्थिक विकास, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर उद्योगजगताची भूमिका आणि दृष्टिकोन मांडण्यासाठी बी-२० ही महत्त्वाची भूमिका बजावते.

डॉ. नरेंद्र पाटील हे भारत आणि जागतिक उद्योजकतेत नवीन संधी निर्माण करणे, या क्षेत्रावर त्यांचा विशेष भर आहे.

द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न

अमेरिकेत होणाऱ्या आगामी बी-२० परिषदेत भारतातील उद्योग-व्यापार संधी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, व्यापारी आणि भारत-विश्वातील विविध देशांमधील आर्थिक सहकार्य या विषयावर चालना देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

विशेषतः महाराष्ट्रातील उद्योग, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, संरक्षण क्षेत्र, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्याच्या दृष्टीने अशा जागतिक व्यासपीठाचे महत्त्व अधिक आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारतीय उद्योगाला जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी या निवडीकडे पाहिले जात आहे.

ब्राझील, अमेरिका आणि इतर देशातील गुंतवणूकदार आणि उद्योग प्रतिनिधींशी समन्वय साधून द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत,

गोदावरी टाइम्स विशेष: गेल्या तीन दशकांपासून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. पाटील यांची यापूर्वी इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालकपदीही निवड झाली होती. एका मराठी उद्योजकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी निवड होणे हे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे.

Post a Comment

0 Comments