Type Here to Get Search Results !

*जंतरमंतर तापलं, महिला पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचे आरोप, प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग*





 

3 ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान *जंतरमंतर तापलं, महिला पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचे आरोप, प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग*


मोठा गोंधळ उडाला. आंदोलनादरम्यान 3 महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला आहे.


*पोलिसांची अधिकृत भूमिका:*

दिल्ली पोलिसांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, "नवी दिल्ली जिल्ह्याने तक्रारी स्वीकारल्या असून निष्पक्ष चौकशीसाठी त्या क्राईम ब्रँच (कमला मार्केट) कडे वर्ग केल्या आहेत." DCP नेहा यादव यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून व्हिडिओ पुरावे असतील तर क्राईम ब्रँचकडे देण्याचे आवाहन केले आहे.


एका तक्रारीत ACP विवेक भगत यांचे नाव आल्याचा दावा आहे. या प्रकरणात AISA अध्यक्ष नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यासह 150 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.


प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने "धक्का आणि नाराजी" व्यक्त करत पत्रकारांना मुक्तपणे काम करू देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनीही गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे जाब विचारला आहे.


*- गोदावरी टाइम्स | बातमी मागची बातमी | नवी दिल्ली*

Post a Comment

0 Comments