Type Here to Get Search Results !

*पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी टाकला नवा डाव*



नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक नेते आणि सोशल मीडियावर 'कराळे मास्तर' म्हणून प्रसिद्ध असलेले *प्रा. नितेश कराळे* यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


*नेमका काय आहे डाव?*

- कराळे मास्तर *5 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये मोठी रॅली काढून* आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विविध जिल्ह्यांतून हजारो समर्थक येणार असल्याचा दावा.

- काँग्रेसने अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिल्याने मविआत बिघाडी झाली आहे. शरद पवार गटाकडे तिकीट मागितले, न मिळाल्यास 'अपक्ष जिंदाबाद'चा नारा कराळे यांनी आधीच दिला होता.

- मागील पदवीधर निवडणुकीत कोणतेही संघटन नसताना त्यांनी *8,500 मते घेत तिसरा क्रमांक* मिळवला होता.

- *मुद्दे:* MPSC पेपरफुटी, बेरोजगारी, पदवीधरांचे प्रश्न, शासकीय भरतीत पारदर्शकता.

- कराळे म्हणाले, "झिरो बजेट निवडणूक लढवणार, विद्यार्थीच खर्च करायला तयार आहेत."


कराळे यांच्या एन्ट्रीमुळे नागपूर पदवीधर निवडणुकीत मविआची डोकेदुखी वाढणार आहे.


*- गोदावरी टाइम्स | बातमी मागची बातमी | नागपूर*

Post a Comment

0 Comments