Type Here to Get Search Results !

*भाजपचे धक्कातंत्र; उमेदवारी नाकारलेल्या शरद लाडांनी मनातलं बोलून दाखवलं, थेट पत्रक काढत स्पष्ट केली भूमिका*






*पुणे, दि. 4 ऑक्टोबर:* विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने मोठे धक्कातंत्र वापरले. विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि 2 वर्षांपासून पदवीधर नोंदणीचे काम करणारे शरद लाड यांचे नाव निश्चित मानले जात होते, मात्र ऐनवेळी पक्षाने *डॉ. स्मिता योगेश जाधव* यांना उमेदवारी जाहीर केली.


या निर्णयानंतर शरद लाड यांनी अधिकृत पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली:


> "पक्षाने पक्षहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेत असताना मला पूर्णपणे विश्वासात घेतले असून, मी या निर्णयाचे स्वागत करतो. या निवडणुकीत मी आणि माझे सर्व सहकारी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. माझी कोणतीही नाराजी नाही. पक्षाचा निर्णय अंतिम."


लाड यांनी बंडखोरीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे आणि नागपूर पदवीधरमधून सुधाकर कोहळे यांना भाजपने तिकीट दिले आहे. मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे.


*- गोदावरी टाइम्स | बातमी मागची बातमी | 4 ऑक्टोबर 2026*

Post a Comment

0 Comments