Type Here to Get Search Results !

सर्वात मोठा निकाल हाती! पुण्यातून हर्षदा देशमुख-जाधव विधानपरिषदेवर, महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी तर महायुतीला मोठा धक्का

 

गोदावरी टाइम्स - ब्रेकिंग / हॉट न्यूज



पुणे | प्रतिनिधी -

विधानपरिषदेच्या पुणे मतदारसंघाचा सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा निकाल अखेर हाती आला असून यामध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) च्या उमेदवार मा. हर्षदा देशमुख-जाधव यांची विधानपरिषदेवर विजयी आघाडी झाली आहे.

पुण्याच्या राजकीय वर्तुळात हा निकाल महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तुतारीचा पुण्यात दबदबा

पुणे मतदारसंघ हा भाजप-महायुतीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र शरद पवार गटाने अत्यंत हुशारीने महिला चेहरा म्हणून हर्षदा देशमुख-जाधव यांना रिंगणात उतरवले आणि त्याचा थेट फायदा झाला. विधानभवनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विजयी बॅनर संपूर्ण पुण्यात झळकले आहेत.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला

हा विजय केवळ एका जागेचा नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे मनोबल वाढवणारा आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या रणनीतीला येथे खिंडार पडल्याचे दिसत आहे.

कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत "हर्षदाताईंचे हार्दिक अभिनंदन, विजयाची आघाडी" अशा घोषणा देत फटाके फोडले आहेत.

अधिकृत आकडेवारी काही वेळातच जाहीर होणार असली तरी हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

- गोदावरी टाइम्स
पोस्टर बनवा

Post a Comment

0 Comments