Type Here to Get Search Results !

अखेर अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, 1 नोव्हेंबरला CJP मैदानात! एकमताने निर्णय घेऊन टाकला!

 

गोदावरी टाईम्स - ब्रेकिंग



नवी दिल्ली/मुंबई | कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अखेर मोठी घोषणा केली आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात होणाऱ्या INDIA आघाडीच्या महारॅलीला CJP ने जाहीर पाठिंबा दिला आहे. 

'GYANU MUST GO!' चा नारा

दीपके यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे - "The Cockroach Janta Party extends its support to the INDIA Bloc's November 1 rally. Nation above all! Jai Bhim, Jai Hind" 

काँग्रेसच्या "वोट बचाओ, देश बचाओ" अभियानांतर्गत ही महारॅली होत असून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेवर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी ही रॅली बोलावली आहे.

CJP ची भूमिका काय?

CJP ने जारी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीचा मूळ सिद्धांत म्हणजे जनता सरकार निवडते, सरकार मतदार निवडत नाही. SIR प्रक्रियेमुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती असून त्यामुळे निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास उडाला आहे, त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा 

या घोषणेसह CJP चे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनीही समर्थन दिले आहे. 

1 नोव्हेंबरच्या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी काही अटींसह परवानगी दिली असून 30 ऑक्टोबर पर्यंत सर्व खासदारांना दिल्लीत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments