Type Here to Get Search Results !

* वैमानिक स्मित मच्छार यांचा हनुमान चालीसा विषयी खुलासा*





*


दुबई, २ ऑक्टोबर:* FlyDubai च्या FZ1073 (दुबई ते तेल अवीव) विमानात ओमानी सह-वैमानिकाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातही १७० प्रवाशांचे प्राण वाचवणारे हिरो कॅप्टन स्मित मच्छार यांनी PM मोदींशी व्हिडिओ कॉलवर बोलताना भावूक खुलासा केला.

"जेव्हा मला वेदना होतात, मी हनुमान चालीसा म्हणतो. त्या वेळीही मी फक्त हनुमान चालीसाच म्हणत होतो. मला माहिती आहे, देवाने मला वाचवलं" असे स्मित म्हणाले.

त्यांनी सांगितले, "मी जमिनीवर पडलो होतो, विमान खाली जात होते. मी स्वतःला सांगितले - ही शेवटची ताकद लाव, दरवाजा उघड. मी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवाशांनी मला वाचवले."

*PM मोदी म्हणाले:* "१४० कोटी भारतीयांना तुमचा अभिमान आहे. संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करतोय, महामृत्युंजय जप सुरू आहे. भारतीय जीव घेणारे नाहीत, जीव वाचवणारे आहेत हे तुम्ही दाखवले."

स्मित सध्या UAE मधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रोज सकाळी आपल्या २ वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन हनुमान चालीसा म्हणतात - "देशापासून दूर आहोत, पण संस्कृतीपासून नाही" असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments