*मुंबई, २ ऑक्टोबर:* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP ने आज शिवाजी पार्क गेट नं ६ येथे जाहीर केलेल्या जेल भरो आंदोलनाआधीच मोठा राडा झाला.
CJP संस्थापक *अभिजित दीपके यांना मरीन ड्राइव्ह परिसरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.* याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत एक महिला पोलीस अधिकारी दीपकेंना "चला, चहा घेऊ" असे म्हणत गाडीत बसण्याचा आग्रह करताना दिसतात. दीपके म्हणतात "मॅडम, मी चहा घेतलाय, मला पुढे जायचंय."
नंतर हसत दीपके म्हणाले - "वरून ऑर्डर आली असावी की यांचा फक्त वेळ वाया घालवा, पोलीस ठाण्यात बसवून ठेवा, बाहेर कुठे फिरू देऊ नका. म्हणून आम्हाला चहाच्या नावाखाली डिटेन केलं."
मुंबई पोलिसांनी याआधीच शिवाजी पार्कवर HC च्या २०१३ च्या आदेशाचा, BMC परवानगी नसल्याचा आणि वाहतूक-ध्वनीप्रदूषणाचा हवाला देत परवानगी नाकारली होती. तरीही CJP आंदोलनावर ठाम आहे.

Post a Comment
0 Comments