Type Here to Get Search Results !

*राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दाव्याला धक्का; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ भाजपने खेचले, दोन्ही उमेदवारही ठरले?*






*पुणे, २ ऑक्टोबर:* विधान परिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीत सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजपने पुण्यातील दोन्ही जागांवर बाजी मारली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

*पुणे पदवीधर:* राष्ट्रवादीने दावा केला होता. गतवेळी अरुण लाड विजयी झाले होते. पण लाड कुटुंब भाजपात आल्याने आता त्यांचे पुत्र *शरद लाड* यांचे नाव भाजपकडून जवळपास निश्चित मानले जात आहे.

*पुणे शिक्षक:* शिवसेनेने दावा केला होता. येथे *श्री विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे* यांचे नाव अंतिम मानले जाते. बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांनी आग्रह धरल्याचे सांगितले जाते. 

*फॉर्म्युला:* एकूण ५ पैकी भाजप ३ (नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर, पुणे शिक्षक), शिवसेना १ (अमरावती शिक्षक), राष्ट्रवादी १ (संभाजीनगर पदवीधर) असा ३:१:१ फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.

*वेळापत्रक:* मतदान २३ ऑक्टोबर, निकाल २७ ऑक्टोबर २०२६.

यामुळे राष्ट्रवादीचे भैय्या माने आणि शिवसेनेचे इच्छुक बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments