*मुंबई, २ ऑक्टोबर:* शिवाजी पार्क येथे CJP च्या जेल भरो आंदोलनाआधी सह-संयोजक आशुतोष रांका यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
*रांका म्हणाले:*
"जर १३ कोटी लोकांची मतं परत येत असतील, आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होत असेल, तर आम्ही जेलमध्ये जायला पूर्ण तयार आहोत. ३ जूनपासून आम्ही तयार आहोत. ज्ञानेश कुमार हा देशातील सर्वात मोठा गद्दार आहे. त्याने १३ कोटी मतदारांना यादीतून वगळले आहे. आजपर्यंत देशात इतका मोठा विश्वासघात कोणीच केला नाही."
रांका यांनी पुढे आरोप केला की, SIR प्रक्रियेच्या नावाखाली मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळून भाजप आणि निवडणूक आयोग मतदार यादीचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत.
"ही लोकशाही वाचवण्याची निर्णायक लढाई आहे. मुंबईकर याकडे सणासारखे पाहत आहेत" असेही रांका म्हणाले.
दरम्यान पोलिसांनी शिवाजी पार्कला परवानगी नाकारली असली तरी CJP ने आंदोलन होणारच असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments