*गांधीनगर, दि. 4 ऑक्टोबर 2026
गुजरात हे उत्तराखंडनंतर समान नागरी कायदा (UCC) लागू करणारे देशातील दुसरे राज्य बनले आहे.
*अधिकृत तपशील:*
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी *17 सप्टेंबर 2026* रोजी गुजरात UCC विधेयक 2026 ला मंजुरी दिली.
- गुजरात सरकारने *1 ऑक्टोबर 2026* रोजी असाधारण राजपत्रात अधिसूचना जारी केली - *Gujarat Act No. 15 of 2026*.
- विधेयक गुजरात विधानसभेत 24 मार्च रोजी 7 तासांच्या चर्चेनंतर मंजूर झाले होते.
*काय आहे कायद्यात?*
- संपूर्ण गुजरात आणि बाहेर राहणाऱ्या गुजराती रहिवाशांना लागू.
- सर्व विवाहांची 60 दिवसांत नोंदणी बंधनकारक, नाहीतर 10,000 रुपयांपर्यंत दंड.
- बहुपत्नीत्वास बंदी, मुलगा-मुलीला समान वारसा हक्क.
- Live-in नातेसंबंधांची नोंदणी बंधनकारक, न केल्यास 3 महिने तुरुंगवास किंवा दंड.
- अनुसूचित जमाती (ST) यांना या कायद्यातून सूट.
कायदा लागू होण्याची तारीख राज्य सरकार स्वतंत्र अधिसूचनेने जाहीर करणार आहे.
*- गोदावरी टाईम्स | बातमी मागची बातमी | सत्य तपासले: खरी बातमी*

Post a Comment
0 Comments