Type Here to Get Search Results !

*पुण्यातील 'सिप्ला'ला तुकाराम मुंडेंचा दणका; थेट परवाना केला रद्द*





*पुणे, २ ऑक्टोबर:* FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिप्लावर कठोर कारवाई केली आहे.

*कारवाई काय?*

महाराष्ट्र FDA ने पुणे-वडकी येथील *मे. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या C&F (Carry & Forwarding) सेंटरचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट २०२६ पासून रद्द केला.*

*कारण काय?*

जून २०२६ मध्ये FDA पथकाने वडकी गोदामावर छापा टाकला होता. तपासणीत धक्कादायक त्रुटी आढळल्या:

 *Reactin Plus* या Schedule H गोळीवर 'वेदना-ताप कमी करणारे' असा अनधिकृत दावा पॅकेजिंगवर लिहिला होता - Drugs & Cosmetics Act १९४० चे उल्लंघन

- ११.१९ लाख रुपयांचा साठा जप्त

- औषधे थेट जमिनीवर ठेवलेली, पॅलेट्सची अपुरी व्यवस्था

- संगणकीय नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत

- मुदतबाह्य औषधांच्या व्यवस्थापनात त्रुटी

- बाजारातून परत मागवण्याच्या (Recall) आदेशाचे पालन नाही

FDA ने म्हटले आहे की अशा जाहिरातींमुळे लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतः औषध घेतील, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका आहे.


Post a Comment

0 Comments