Type Here to Get Search Results !

सहकारी बँकांच्या निवडणुका लांबणीवर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

 

गोदावरी टाइम्स - एक्सक्लुझिव्ह



मुंबई / प्रतिनिधी - राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह (DCCB) राज्यातील 5 हजारहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत.

दुष्काळ हे कारण

राज्य सरकारने 304 तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. दुष्काळ निवारण आणि मदतकार्याला प्राधान्य देण्यासाठी महसूल, कृषी, सहकार, ग्रामविकास विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आल्याने निवडणुका घेणे लोकहिताचे नसेल, असा दावा सहकार विभागाने केला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (KDCC) निवडणुकीसह जिल्ह्यातील सुमारे 1000 संस्थांच्या निवडणुका थांबणार आहेत.

सहकार विभागाने 27 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात शासन आदेश जारी केला असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कक (73CC) अन्वये हा निर्णय घेतला आहे. b9f8

कोणाला सूट?

मात्र या स्थगितीतून काही संस्थांना वगळण्यात आले आहे:

  1. सहकारी गृहनिर्माण संस्था
  2. ज्या संस्थांच्या निवडणुकीबाबत हायकोर्ट/सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत
  3. ज्या संस्थांची नामनिर्देशन प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2026 पूर्वी सुरू झाली आहे

राजकीय वर्तुळात खळबळ

'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर आता जिल्हा बँकांच्या निवडणुकांसाठी महायुतीने कंबर कसली होती. मात्र या निर्णयामुळे सर्वच राजकीय हालचालींना तात्पुरता ब्रेक लागणार आहे. आता पुढील आदेशापर्यंत म्हणजेच दुष्काळाची परिस्थिती निवळेपर्यंत, कदाचित ऑक्टोबर 2027 पर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments