*नवी दिल्ली:* रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी सुप्रीम कोर्टाने एक दिलासादायक आणि मोठा निर्णय दिला आहे. तिकीट सापडले नाही, म्हणून नुकसानभरपाई नाकारता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
*काय आहे प्रकरण?*
2017 मध्ये गुजरातमध्ये साबरमती ते अहमदाबाद दरम्यान महेशभाई नावाचे प्रवासी गर्दीमुळे ट्रेनमधून पडले होते. उपचारादरम्यान 31 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आई-वडिलांनी दावा केला की तिकीट हरवले आहे. रेल्वे क्लेम ट्रिब्युनलने त्यांना 8 लाख रुपये भरपाई आणि 9% व्याज देण्याचा आदेश दिला होता.
गुजरात हायकोर्टाने तिकीट नसल्याचे कारण देत हा दावा फेटाळला होता. त्याविरोधात पालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
*सुप्रीम कोर्टाचा निकाल:*
न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि अतुल एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने 25 सप्टेंबर 2026 रोजी निकाल देताना सांगितले - _"तिकीट सापडले नाही, याचा अर्थ तो प्रवासी तिकीटविना होता असे म्हणता येणार नाही. शपथेवर दिलेला जबाब महत्त्वाचा आहे. रेल्वेने खिशाची तपासणीही केली नाही"_.
कोर्टाने गुजरात हायकोर्टाचा आदेश रद्द करून ट्रिब्युनलचा 8 लाख रुपयांचा भरपाईचा आदेश कायम केला असून, 30 दिवसांत पैसे द्यावेत असे आदेश रेल्वेला दिले आहेत.

Post a Comment
0 Comments