Type Here to Get Search Results !

*दसरा, दिवाळीआधीच रेल्वेचं गिफ्ट, मुंबईसह सोलापूर, कोल्हापूर, लातूर, चेन्नई, कलबुर्गीसाठी 102 स्पेशल ट्रेन!*


गोदावरी टाइम्स बातमी - 


*दसरा, दिवाळीआधीच रेल्वेचं गिफ्ट, मुंबईसह सोलापूर, कोल्हापूर, लातूर, चेन्नई, कलबुर्गीसाठी 102 स्पेशल ट्रेन!*

*सोलापूर, 26 सप्टेंबर 2026* - सणासुदीच्या गर्दीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मोठी घोषणा केली आहे. दसरा-दिवाळीत 102 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 

*3 मुख्य मार्ग:*

1. *CSMT मुंबई - चेन्नई बीच साप्ताहिक:* 12 फेऱ्या (01015/01016). मुंबईतून दर बुधवारी 00:35 वाजता (14 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर), चेन्नईहून दर गुरुवारी 04:00 वाजता परत. थांबे: दादर, ठाणे, कल्याण, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुंतकल इत्यादी.

2. *CSMT मुंबई - लातूर द्वि-साप्ताहिक:* 26 फेऱ्या. मुंबईतून दर मंगळवार, गुरुवारी 00:35 (13 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर), लातूरहून 16:30 वाजता परत. थांबे: उरुळी, भिगवण, कुर्डूवाडी, बार्शी, धाराशिव.

3. *कोल्हापूर - कलबुर्गी दैनिक (शुक्रवार वगळून):* सर्वात मोठी सेवा - 64 फेऱ्या (10 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर). कोल्हापूरहून सकाळी 6:10, कलबुर्गीहून संध्याकाळी 6:10. मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर मार्गे. 

*बुकिंग:* 27 सप्टेंबरपासून IRCTC वेबसाइट, RailOne अॅप आणि आरक्षण केंद्रावर सुरू.

संपूर्ण मध्य रेल्वेने यंदा 418 सण विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments