Type Here to Get Search Results !

*अंबरनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल टिळेकरांची बिनविरोध निवड*

 * गोदावरी टाइम्स न्यूज*

*लोणी काळभोर :* कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल रामचंद्र टिळेकर, तर उपाध्यक्षपदी प्रकाश अंकुश कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.


मावळते अध्यक्ष हरिभाऊ कदम व उपाध्यक्षा स्वाती काळभोर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही पदांसाठी एकमताने निवड करण्यात आली.


१९९२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेकडे सुमारे २ कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी असून, १ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये आहे.


यावेळी माजी अध्यक्ष सूर्यकांत खैरे, अशोक कदम, आशा खैरे, सोमनाथ गुजर, ज्ञानेश्वर काळभोर, व्यवस्थापक मारुती सातव यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments