Type Here to Get Search Results !

*लोणी काळभोर: विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पादुकांचा मान परंपरा पुनरुज्जीवित करा, गोदावरी चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार*



*लोणी काळभोर: विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पादुकांचा मान परंपरा पुनरुज्जीवित करा, गोदावरी चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार*


लोणी काळभोर | प्रतिनिधी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शान आहे. पूर्वीच्या परंपरेनुसार लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना मान मिळत होता. ही परंपरा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानली जाते.

मात्र सध्या ही परंपरा खंडित झाली असून, सध्या कदमवाकवस्ती येथील पालखीतळावर दिंडी व पादुका विराजमान होतात. तेथे विठ्ठल मंदिर नसल्याने "परंपरेनुसार पादुका या विठ्ठल मंदिरातच शोभतात" अशी भावना ग्रामस्थ आणि वारकऱ्यांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर *गोदावरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय बबन काळभोर* यांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना लेखी निवेदन दिले आहे.

*निवेदनातील मुख्य मुद्दे:*

- लोणी काळभोर येथे नवीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधण्यात यावे.

- ग्रामपंचायत, ट्रस्ट, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ही परंपरा पुनरुज्जीवित करावी.

- मंदिर बांधकामासाठी आवश्यक निधी गोदावरी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत उपलब्ध करून देण्याची ग्वाही ट्रस्टने दिली आहे.

- "जिथे विठ्ठल तिथे पादुका" ही भावना जपावी.

*ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद नाही?*

ट्रस्टने सांगितले की, विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी गावातील ट्रस्ट किंवा ग्रामपंचायतीकडून नवीन इमारतीसाठी सूचना अद्याप मिळाली नाही किंवा नियोजन करण्यात आलेले नाही. ग्रामसभेत विषय मांडून लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

या मागणीला वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांकडून पाठिंबा मिळत आहे.


Post a Comment

0 Comments