Type Here to Get Search Results !

*बीड : दुष्काळात गैरहजर तहसीलदारावर कलेक्टरांची कडक कारवाई, पदभार काढला*

बीड | विशेष प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात दुष्काळाचे गंभीर संकट असताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासनात शिस्तीचा बडगा उगारला आहे.

जिल्ह्यावर दुष्काळाची परिस्थिती असताना कुणीही न सांगता रजेवर जाणार नाही, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र केजचे तहसीलदार या आदेशाला न जुमानता बिनपरवानगी रजेवर गेल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीने कारवाई करत केजच्या तहसीलदारांचा पदभार काढून टाकला आणि तो अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवला.

*कलेक्टरांची भूमिका स्पष्ट:*

दुष्काळाच्या काळात प्रशासनातील प्रत्येक अधिकारी मैदानात असणे गरजेचे आहे. शेतकरी आणि सामान्य माणूस संकटात असताना अधिकारीच जर गैरहजर राहणार असतील तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.


या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांसाठी हा एक चांगला धडा ठरणार आहे. दुष्काळ निवारण कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments