लोणी काळभोर | प्रतिनिधी
लोणी काळभोर परिसरात सध्या रस्त्याच्या मधोमध केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मात्र या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
*मुख्य समस्या:*
1. रस्ता बंद केला आहे, पण कुठेही सूचना फलक लावलेला नाही.
2. पर्यायी मार्गाबत माहिती नाही, वाहनचालकांना अचानक रस्ता बंद असल्याचे समजते.
3. काम कोणत्या कंपनीचे / विभागाचे चालू आहे, याची माहिती नाही.
4. ग्रामपंचायत, PWD की महावितरणच्या परवानगीने काम सुरू आहे, याचा खुलासा नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सकाळी शाळा, कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय. धुळीमुळे दुकानदार त्रस्त आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांमुळे अपघाताची भीती आहे.
*प्रशासनाला मागणी:*
कामाच्या ठिकाणी तातडीने सूचना फलक लावावेत, पर्यायी मार्ग दाखवावेत, कामाची माहिती, ठेकेदाराचे नाव आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव फलकावर लिहावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या बाबत संबंधित विभागाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी गोदावरी टाईम्सकडे करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments