अरबी समुद्रात अमली पदार्थ तस्करीविरोधात भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात ATS ने मोठी संयुक्त कारवाई केली आहे.
लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील समुद्रात गस्त घालत असताना एका संशयास्पद इराणी बोटीला अडवण्यात आले. या बोटीची झडती घेतली असता त्यातून तब्बल *५२६ किलो अमली पदार्थांचा साठा* जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत *३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त* असल्याचा अंदाज आहे.
ही बोट चालवणाऱ्या *५ पाकिस्तानी नागरिकांना* ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असल्याचे समोर आले असून, या मागे पाकिस्तानस्थित तस्करांचा हात असल्याचा संशय आहे.
ताब्यात घेतलेल्या बोटीला आणि आरोपींना पुढील चौकशीसाठी गुजरात किनाऱ्यावर आणण्यात आले आहे.
*कोस्ट गार्डचे मोठे यश* म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे.

Post a Comment
0 Comments