Type Here to Get Search Results !

पुणे महापालिका भरती घोटाळ्यात मोठा मासा गळाला : जेजुरी देवस्थानचा माजी विश्वस्त गजाआड


पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी *डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर* याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) अटक केली. 6f

*काय आहे प्रकरण?*

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत महापालिकेतील विविध जागांवर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले. खोटे शिक्के, बनावट नियुक्तिपत्रे आणि अधिकृत भासणारी कागदपत्रे तयार करून या तरुणांकडून कोट्यवधी रुपयांची रोकड उकळल्याचा संशय आहे. 

या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींना अटक केली असून खेडेकर हा मुख्य संशयितांपैकी एक आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी खेडेकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. 

*न्यायालयाचा निर्णय:*

अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना *३ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच 5 दिवस पोलीस कोठडीत* ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले. 

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर जेजुरी देवस्थानने खेडेकरला विश्वस्त पदावरून बाजूला केले होते.


Post a Comment

0 Comments