Type Here to Get Search Results !

मनोज जरांगे पाटलांकडून मंडप काढण्याचे आदेश


*'अंतरवाली'तून आता घुमणार नाही 'एक मराठा लाख मराठा'चा आवाज; मनोज जरांगे पाटलांकडून मंडप काढण्याचे आदेश


*

*छत्रपती संभाजीनगर / जालना, 26 सप्टेंबर 2026* - मराठा आरक्षण आंदोलनात मोठा ट्विस्ट.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर केले की अंतरवाली सराटी येथील निर्णायक आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तिथे उभारलेला स्टेज आणि मंडप काढण्यात आला आहे.

*जरांगे पाटील म्हणाले:*

- "अंतरवालीतील अंतिम लढा आता स्थगित केला आहे."

- सरकारला 3 महिन्यांचा (90 दिवस) अल्टिमेटम दिला आहे. 17 सप्टेंबरला 20 दिवसांचे उपोषण सोडले होते.

- जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर *Mission-3 पाटोद्यातून सुरू होणार*, त्यानंतर थेट मुंबईकडे कूच.

- गरज पडल्यास येवला, परळी किंवा पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होऊ शकते.

जरांगे यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आणि ईडी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

"आम्ही शांत आहोत, पण रस्त्यावर उतरून लढा देऊ" - जरांगे पाटील

Post a Comment

0 Comments