Type Here to Get Search Results !

*पुण्यातील आमदाराची 'लाडक्या' ठेकेदारासाठी मुजोरी; ९० कोटींच्या निविदेसाठी थेट आयुक्तांनाच दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी*


*पुणे | 28 Sept 2026, 11:12 PM |* पुणे महापालिकेत मोठा गोंधळ!

*काय आहे प्रकरण?*

- *काम:* आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल - मुळा-मुठा नदी काठाने *17 मीटर रुंद, 2 किमी लांब वेलस्ली रस्ता*

- *खर्च:* *90 कोटी रुपये*

- *निविदा:* डिसेंबर 2025 मध्ये काढली, 8 ठेकेदार सहभागी

- *प्रश्न:* शहरातील एका भाजप आमदाराचा *लाडका ठेकेदार पात्र होत नसल्याने* आमदाराने एका *पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी* प्रशासनावर दबाव आणला

 *परिणाम:* निविदा प्रक्रिया *6-7 महिने रखडली*

*आयुक्तांचा निर्णय आणि धमकी:*

आयुक्त *नवल किशोर राम* यांनी "जे योग्य आहे तसे करा" असे आदेश देत कागदपत्र छाननी करण्यास सांगितले.

- छाननीत आमदार ज्याला अपात्र करू इच्छित होते तोच ठेकेदार *पात्र ठरला*

- त्या पात्र ठेकेदाराने आमदाराच्या ठेकेदारापेक्षा *9 कोटी रुपयांनी कमी खर्च* दाखवला - महापालिकेची बचत!

यामुळे नामुष्की ओढवल्याने संतप्त आमदाराने *थेट आयुक्तांनाच फोनवरून गुन्हा दाखल करण्याची धमकी* दिली. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना *"विधानसभेत हक्कभंग आणल्यावर कळेल"* अशीही धमकी.

आयुक्त नवल किशोर राम यांनी धमकी आल्यास दुजोरा दिला, पण नाव उघड केले नाही.

प्रशासनात प्रचंड अस्वस्थता.

*- गोदावरी टाइम्स*

Post a Comment

0 Comments