Type Here to Get Search Results !

*थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना*


*नवी दिल्ली | 28 Sept 2026, 5:07 PM |* तुमचंही ट्रॅफिक ई-चलान पेंडिंग आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची!

*सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?*

न्यायमूर्ती *जे. बी. पारदीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन* यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणीत म्हटले -

"जर लोक ट्रॅफिक चलान भरत नसतील, तर ती रक्कम त्यांच्या *वीज बिलात जोडून द्या*. त्यांना वीज बिल भरावेच लागेल, नाहीतर वीजपुरवठा खंडित केला जाईल. या देशात वसुलीसाठी कोणताही प्रभावी मार्ग शोधावाच लागेल."

*आकडेवारी धक्कादायक:*

- देशभरात *45,000 कोटी* रुपयांचे ई-चलान प्रलंबित

- आतापर्यंत फक्त *25,000 कोटी* वसूल

- *20,000 कोटी* अजूनही थकबाकी

*न्यायालयाने सुचवलेले इतर कडक उपाय:*

- थकबाकी असेल तर *RC नूतनीकरण बंद*

- *PUC, Fitness Certificate* जारी न करणे

- वाहन *परिवहन पोर्टलवर ब्लॅकलिस्ट*

- मालकी हस्तांतरण (Ownership Transfer) बंद

- *ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण थांबवणे / निलंबित करणे*

- रॅन्डम चेकिंगमध्ये *वाहन जप्ती*

*महत्त्वाचे:* हा अजून अंतिम आदेश नाही, सूचना/सल्ला आहे. पण कोर्टाच्या टिप्पणीमुळे लवकरच कठोर नियम येण्याची शक्यता.

Post a Comment

0 Comments