*मुंबई | 29 Sept 2026, 11:51 AM |* केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांमधील मतभेदांनंतर आता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी *एस. चोकलिंगम* यांनीही आयोगाला थेट पत्र लिहून आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे.
आधी आयुक्त *सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी* यांनी मागील 10 महिन्यांत 14 आक्षेप नोंदवले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता चोकलिंगम यांनी *24 सप्टेंबर रोजी* आयोगाला पत्र पाठवले आहे.
*SIR प्रक्रियेत अडचण काय?*
महाराष्ट्रात सध्या SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या *'ECINet' सॉफ्टवेअरमध्ये ERO (Electoral Registration Officer) चे अधिकार कमी* केल्याने स्थानिक पातळीवर नव्या मतदारांची नोंदणी करता येत नाही. गोव्यात 97 मतदारांचे असेच प्रकरण घडले होते.
*चोकलिंगम यांच्या 4 ठळक मागण्या:*
*1. ज्येष्ठ-दिव्यांगांना सूट:* कागदपत्रे वैध असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी न बोलावता सूट देण्याचा पर्याय ECINet मध्ये द्यावा.
*2. अतिरिक्त कागदपत्र मान्यता:* आदिवासी, बेघर आणि वंचित घटकांसाठी नेहमीच्या 13 दाखल्यांव्यतिरिक्त इतर समकक्ष पर्यायी कागदपत्रे स्वीकारावीत.
*3. ERO ला अधिकार पूर्ववत करा:* मतदार यादीतील त्रुटींवर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे न पाठवता ERO लाच असावेत. तसेच तार्किक विसंगती (logical discrepancies) दूर करण्याचा अधिकारही ERO कडे असावा.
*4. लेखी नियमावली:* तोंडी सूचनांऐवजी केंद्रीय आयोगाने लेखी नियमावली / FAQ जारी करावी. प्रत्येक विसंगतीसाठी SIR उतारा अपलोड करणे ऐच्छिक करावे.
आता या पत्रावर केंद्रीय आयोग काय भूमिका घेतो याकडे लक्ष आहे. महाराष्ट्रात SIR मधून 2 कोटी नावे वगळल्याचा दावा होत असतानाच ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा होत आहे

Post a Comment
0 Comments