Type Here to Get Search Results !

*ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड*


 *नवी दिल्ली, दि. 25 सप्टेंबर:* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या आणि राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जंतर मंतर येथे AISA (All India Students Association) ने पुकारलेल्या आंदोलनाला तणावाचे स्वरूप आले. शेकडो विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते जंतर मंतरवर जमा होताच दिल्ली पोलिसांनी धरपकड सुरू केली.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा, ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव, दिपांकर भट्टाचार्य, वकील प्रशांत भूषण, RJD खासदार मनोज झा यांच्यासह सुमारे 40-50 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.


हे आंदोलन निवडणूक आयोगाच्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपावरून करण्यात आले. 'The Indian Express' च्या रिपोर्टनंतर हा वाद अधिक चिघळला असून निवडणूक आयोगाने मात्र सर्व निर्णय एकमताने झाल्याचे म्हटले आहे.


या धरपकडीनंतर AISA ने म्हटले आहे की, "शांततापूर्ण आंदोलन दडपून लोकशाहीचे प्रश्न दाबता येणार नाहीत."

Post a Comment

0 Comments