*सिक्कीम:* सिक्कीमच्या ग्यालशिंग जिल्ह्यातील रिम्बी गावात गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनात 20 हून अधिक घरे आणि सरकारी निवासस्थाने वाहून गेली आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्णब' चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी त्याचा परिणाम म्हणून या भागात अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे ओडिशा, छत्तीसगडसह नऊ राज्यांना फटका बसला आहे.
प्रशासनाने तात्काळ परिसर रिकामा करून 8 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बचावकार्य सुरू असून पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Post a Comment
0 Comments