*मुंबई, 25 सप्टेंबर 2026* - गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. गोरेगाव ते दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी) दरम्यानचा *1.26 किमी लांबीचा 3x3 लेनचा उड्डाणपूल 15 ऑक्टोबर 2026 पासून वाहतुकीसाठी खुला* होणार आहे.
*काय आहे फायदा?*
- *प्रवास वेगवान:* गोरेगाव ते मुलुंड प्रवासाचा वेळ सध्याच्या *75 मिनिटांवरून फक्त 25 मिनिटांवर* येणार.
- *12.20 किमीचा मेगा प्रकल्प:* हा GMLR प्रकल्प पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारे जुळे भुयारी बोगदेही याला जोडले जातील.
- *मार्ग:* दिंडोशी न्यायालया पासून सुरू होऊन रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे वळून फिल्म सिटी येथे उतरतो.
*तांत्रिक अपडेट:* BMC चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लोड टेस्ट होणार असून बॅरिकेड्स हटवून सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे इंधन बचत आणि मुंबईच्या AQI मध्येही सुधार
णा होईल.

Post a Comment
0 Comments