Type Here to Get Search Results !

BREAKING : शिंदेंच्या बंगल्यासमोरच एस्कॉर्ट गाडी पेटली! मध्यरात्री ठाण्यात खळबळ, अग्निशमन दल घटनास्थळी

 




ठाणे, दि. 7 नोव्हेंबर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर शुक्रवारी मध्यरात्री थरार पाहायला मिळाला. ठाणे पश्चिम भागातील लुईसवाडी परिसरात शिंदेंच्या बंगल्यासमोर उभ्या असलेल्या पोलीस एस्कॉर्ट वाहनाला अचानक आग लागली.

पोलिसांची अनेक वाहने एका रांगेत उभी होती. त्याचवेळी एका एस्कॉर्ट वाहनातून अचानक धूर येऊ लागला. धूर येताच काही क्षणातच आगीने पेट घेतला. आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांची एकच धावाधाव झाली.

माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.

आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली का, की आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

Post a Comment

0 Comments