Type Here to Get Search Results !

तिसऱ्या अपत्याचा नियम तात्काळ रद्द करा! मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे; लाखो इच्छुकांची जोरदार मागणी

 

गोदावरी टाइम्स | महाराष्ट्र विशेष | महाब्रेकिंग


सुप्रीम कोर्टानेच नियमाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, मग सरकार निर्णयासाठी विलंब का करत आहे? गोकुळसाठी एका रात्रीत कायद्यात बदल करण्याची तयारी, मग सामान्य नागरिकांच्या राजकीय हक्कांसाठी तत्परता कधी?

 महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका लढवण्याची तयारी करणाऱ्या हजारो इच्छुकांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळत आहे – तिसरे अपत्य असल्यामुळे निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवणारा कायदा सरकार तात्काळ रद्द करणार का? सर्वोच्च न्यायालयाने दोन अपत्यांच्या नियमाच्या प्रासंगिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करून 2003 मधील ऐतिहासिक निकालाच्या फेरविचाराचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे पाठवल्यानंतर महाराष्ट्रात या कायद्याविरोधातील आवाज अधिक तीव्र झाला आहे.


Post a Comment

0 Comments