Type Here to Get Search Results !

*हेडलाईन: वीज कामगार संघटना सचिवपदी बाळासाहेब सायकर, केंद्रीय उपाध्यक्षपदी सय्यद अपसरपाशा : 72 व्या केंद्रीय कार्यकारिणी सभेत मोठा निर्णय*

 *गोदावरी टाइम्स - लोणी काळभोर स्पेशल ब्रेकिंग*





*लोणी काळभोर, दि. 2 नोव्हेंबर (वार्ताहर) -*


महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या *72 व्या केंद्रीय कार्यकारिणी सभेत* महत्त्वाच्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.


या सभेत *केंद्रीय संयुक्त सचिवपदी बाळासाहेब सायकर* तर *केंद्रीय उपाध्यक्षपदी सय्यद अपसरपाशा* यांची निवड करण्यात आली आहे.


संघटनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने होल्डिंग विंगमध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


या निवडीबद्दल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष *भाऊसाहेब भाकरे पाटील* यांच्या हस्ते आणि सरचिटणीस *हाजी सय्यद जाहिरोद्दीन* यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळणार असून, कामगारांच्या विविध प्रश्नांना आणि समस्यांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेची ताकद वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


नवनियुक्त दोन्ही पदाधिकारी संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार कामगारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करून संघटना अधिक सक्षम, एकजूट आणि बळकट करण्यासाठी योगदान देतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


*- गोदावरी टाइम्स, लोणी काळभोर*



Post a Comment

0 Comments