Type Here to Get Search Results !

हेडलाईन: आयटी जगतात भूकंप! अमेरिकेकडून TCS, Infosys सह 8 मोठ्या IT कंपन्यांवर बंदी नाही तर Green Card प्रक्रियेतून हकालपट्टी


गोदावरी टाइम्स - ब्रेकिंग



वॉशिंग्टन/न्यूयॉर्क | 9 ऑक्टोबर 2026 | गोदावरी टाइम्स

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय IT कंपन्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने (US Department of Labour) 8 मोठ्या कंपन्यांना Permanent Labour Certification Program (PERM) मधून निलंबित केले आहे.

कोणत्या 8 कंपन्या?

  1. TCS
  2. Infosys
  3. Wipro
  4. HCL Technologies
  5. Cognizant
  6. Capgemini
  7. Microsoft
  8. Adobe

ही घोषणा कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग आणि उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी Anti-Fraud Task Force मार्फत X वर केली.

बंदी म्हणजे नेमकं काय?

  • PERM ही Green Card ची पहिली पायरी आहे - कंपनीला सिद्ध करावे लागते की या पदासाठी अमेरिकन कर्मचारी मिळत नाही.
  • अमेरिकेचा आरोप - या कंपन्यांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून त्याच जागेवर कमी पगारात परदेशी कर्मचाऱ्यांना स्पॉन्सर केले. उदा. Microsoft ने 2025 मध्ये 6,000 अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढले आणि 3,600 Green Card अर्ज टाकले.
  • आता या कंपन्यांचे नवीन PERM अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि जुने प्रलंबित अर्जही रोखले जातील. 

परिणाम काय?

  • H-1B व्हिसा रद्द होणार नाही, काम करू शकता.
  • पण H-1B वरून Green Card कडे जाण्याचा रस्ता सध्या बंद - हजारो भारतीय IT अभियंत्यांचे अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचे स्वप्न लांबणीवर.
  • ज्यांचे Green Card आधीच मंजूर आहे त्यांच्यावर परिणाम नाही.
  • Harvard, Yale, Stanford सह 9 विद्यापीठांवरही चौकशी सुरू आहे - पगार कमी ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना घेतल्याचा आरोप.

Post a Comment

0 Comments