*गोदावरी टाइम्स - दिल्ली / स्पेशल*
*नवी दिल्ली | १० ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स*
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत पुकारलेल्या 'जंतर-मंतर २.०' आंदोलनापूर्वीच सरकारने दडपशाही सुरू केली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक *अभिजित दीपके, सहसंस्थापक सौरव दास आणि आशुतोष रांका* यांना आज सकाळी १०.४५ वाजता इंदिरा गांधी विमानतळावर विमानात घुसून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. विमानातून खालीही उतरू दिले नाही.
पण आंदोलन फ्लॉप होईल असा पोलिसांचा अंदाज फोल ठरला. अटक होताच CJP ने आपला *Plan B* सक्रिय केला आणि सरकारची डोकेदुखी आणखी वाढवणारा मोठा निर्णय जाहीर केला.
*CJP चा मोठा निर्णय काय?*
*१) आंदोलन मागे नाही, तर आणखी तीव्र:* CJP ने स्पष्ट केले - "आम्ही माघार घेणार नाही. जंतर-मंतरवर परवानगी नाकारली तर आमचे आंदोलन थांबणार नाही. आता पुन्हा जंतर-मंतरवरच आणि देशभरात आंदोलन होणारच!"
*२) नेतृत्व बदल:* दीपकेंच्या अटकेनंतर आंदोलनाची धुरा आता *लातूरचे अजिंक्य शिंदे* यांच्याकडे सोपवली आहे. शिंदे हे CJP चे राष्ट्रीय संघटना प्रभारी आहेत. दीपके यांनी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत सांगितले होते - "मला अटक झाली तर अजिंक्य शिंदे नेतृत्व करेल."
*३) सरकारवर गंभीर आरोप - "ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी आणीबाणी":* अजिंक्य शिंदे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे - "सरकार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवत आहे. त्यासाठी दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. ही मोठी लढाई आहे. आम्हाला कुठे नेले आहे, याचीही माहिती दिली जात नाही."
*४) गनिमी काव्याने आंदोलन:* जंतर-मंतरला छावणीचे स्वरूप आले असून ५०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तरीही CJP कार्यकर्त्यांनी कॅनॉट प्लेस, मिंटो ब्रिज, LIC बिल्डिंग चौकात गनिमी काव्याने घोषणाबाजी सुरू केली आहे. CJP ने आवाहन केले आहे - *"दिल्ली पोलीस जिथे अडवेल, तेच तुमचे जंतर-मंतर समजा!"*
*दुसरीकडे भावनिक पेच -*
या सगळ्यात अभिजित दीपके यांच्यावर वैयक्तिक दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या ८५ वर्षीय आजी *सावित्रीबाई शंकरराव दीपके* यांचे आज सकाळी ११.३० वाजता हिंगोलीतील संतूक पिंपरी गावात निधन झाले. दिल्ली पोलिसांनी दीपके यांना दोन पर्याय दिले आहेत - "पोलिसांच्या ताब्यातच राहायचे की आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी जायचे?"
दीपके काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. पण त्यांनी आंदोलनाची जबाबदारी सोपवून सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे - एकाला अटक कराल, हजारो अजिंक्य शिंदे तयार होतील!
*आणि आता सोनम वांगचुक यांचा २४ तासांचा अल्टिमेटम* या आंदोलनाला मिळाल्याने सरकारच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

Post a Comment
0 Comments