गोदावरी टाइम्स - मोठी अपडेट
"
मुंबई | १९ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात एक मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे की, हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन आहेत. मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
पोलिसांनी काय सांगितले?
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ३ अज्ञात आरोपींविरोधात जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे - BNS कलम १०९(१), ३(५) आणि शस्त्र कायदा कलम ३, २५ अन्वये.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकलवर आलेले ३ हल्लेखोर होते. दोघांनी गोळीबार केला आणि तिसरा पळून जाण्यासाठी मदत करत होता. या आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचच्या १५ विशेष टीम तयार करण्यात आल्या असून, CCTV फुटेज तपासले जात आहे. एका संशयिताला संताक्रूझमध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
अल्पवयीन असण्याच्या चर्चेवर पोलिसांचे म्हणणे आहे की तपास सुरु आहे, आरोपींची ओळख पटवणे बाकी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले?
या घटनेनंतर गृहखात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलली.
१. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी बोलून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाईचे आदेश दिले.
२. टायगर श्रॉफशी फोनवर बोलून धीर दिला - "आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आरोपींना लवकरच शोधून काढू, काळजी करू नका."
३. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले -
"कोणतीही गँग असो किंवा व्यक्ती असो, कोणालाही सोडले जाणार नाही. अशा धमक्यांद्वारे कोणी काम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना सरळ कसे करायचे हे मुंबई पोलिसांना चांगलेच माहीत आहे."
लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेणार का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "आम्ही आधीच विनंती पाठवली आहे आणि कारवाई सुरु आहे. सूत्रधार कुठेही लपलेले असले तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुंबई पोलीस त्यांना जगाच्या पाठीवरून शोधून काढतील."
लॉरेन्स गँगचा दावा काय?
अनिल पंडित आणि हरमन संधू नावाच्या दोन व्यक्तींनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना धमकी दिली आहे. मात्र पोलिस या दाव्याची पडताळणी करत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा टायगरच्या घरी जाऊन भेट घेतली. टायगर सुखरूप असून त्याच्या हाताला दारूच्या धुरामुळे आणि काचेमुळे किरकोळ जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments