Type Here to Get Search Results !

धनुष्यबाण कोणाला मिळणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘सुप्रीम’ सुनावणी, कोर्टात कुणाला बसणार झटका?




नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2026 | गोदावरी टाइम्स

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा वाद सुरू आहे.

कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल:

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारलं - "धनुष्यबाण चिन्ह दोन्ही गटांना नाकारण्याचा पर्याय तुम्ही तपासला का? दोन्ही गटांना स्वतंत्र, तटस्थ चिन्हांवर लढवता आलं असतं ना?"

न्या. बागची म्हणाले - "दोघांनीही बाळासाहेबांच्या नावावर नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावं."

शिंदे गटाचा युक्तिवाद:

वकील नीरज किशन कौल यांनी आकडेवारी मांडली:

  • 2019 मध्ये शिवसेनेचे 55 आमदार जिंकले
  • शिंदे गटाच्या 40 आमदारांना 76% मते मिळाली
  • ठाकरे गटाच्या 15 आमदारांना 23.5% मते मिळाली
  • लोकसभेत 18 पैकी शिंदे गटाच्या 13 खासदारांना 73% मते

विधिमंडळातील बहुमत हाच निकष योग्य असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.

ठाकरे गटाचा आक्षेप:

निवडणूक आयोगाने घाईत निर्णय घेतला, आमदार अपात्रतेचा निकाल लागण्यापूर्वीच चिन्ह दिलं असा आरोप. मतदार पक्षाला मतदान करतो, व्यक्तीला नाही असं कोर्टानेही नमूद केलं.

पुढील सुनावणी आठ ऑक्टोबर ला होणार असून CJI सूर्यकांत फेब्रुवारी 2027 मध्ये निवृत्त होणार आहेत, त्याआधी निकाल येणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Post a Comment

0 Comments