Type Here to Get Search Results !

हेडलाईन: नागपुरात भाजपला मोठा धक्का! गडकरींचे निकटवर्तीय गिरीश व्यास यांचा सर्व पदांचा राजीनामा, बंडखोर अनिल सोले यांना पाठिंबा



नागपूर | १० ऑक्टोबर २०२६ | गोदावरी टाइम्स

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपमध्ये बंडाचा भडका उडाला आहे! विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

त्यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रा. अनिल सोले यांना थेट पाठिंबा जाहीर केला असून, महाल परिसरातील आपले स्वतःचे कार्यालय सोले यांच्या प्रचारासाठी खुले करून दिले आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ, बडकस चौकात आहे.

वाद काय आहे?
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी (नागपूर, पुणे, संभाजीनगर पदवीधर + पुणे, अमरावती शिक्षक) २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. भाजपने नागपूर पदवीधरमधून सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिली, तर माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष बंडखोरी केली.

या उमेदवारीवरच व्यास यांचा आक्षेप आहे.

गिरीश व्यास काय म्हणाले?

"मी अनिल सोले यांना शब्द दिला होता. पक्ष कारवाई करेल म्हणून मीच राजीनामा दिला. माझ्या पायावर धोंडा मारून घेतोय, पण मला मान्य आहे. अनिल सोले १००% निष्ठावंत आहेत आणि १००% निवडून येतील."
"भाजपच्या बांधणीसाठी आम्ही तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं. पक्षाच्या संविधानानुसार नावं पार्लमेंटरी बोर्डाकडे जायला हवी होती, पण प्रक्रिया पाळलीच गेली नाही. कानामागून आलेले तिखट झाले, आणि जुन्या निष्ठावंतांचे मरण झाले आहे का?"

कोण आहेत गिरीश व्यास?
गिरीश व्यास हे काही साधे कार्यकर्ते नाहीत:

  • जनसंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पंडित बच्छराज व्यास यांचे पुत्र
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय
  • २०१६ ते २०२२ नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद आमदार

पक्षाने ५० वर्षे काम करूनही विश्वासात घेतले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या बंडामुळे नागपूर पदवीधरची लढत आता अधिकृत भाजप (कोहळे) Vs बंडखोर भाजप (सोले + व्यास) अशी झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या गडात भाजपपुढे बंड थोपवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Post a Comment

0 Comments