गोदावरी टाइम्स | सहकार - पुणे जिल्हा बँक निवडणूक २०२६
उरुळी कांचन | २५ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच हवेली तालुक्यात राजकीय आणि सहकार क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे.
सहकारातील अनुभवी व्यक्तिमत्व आणि ७०० कोटींचा संमिश्र व्यवसाय असलेल्या डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांनी 'क' (सहकारी बँक व पतसंस्था) मतदार संघातून संचालक पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काय आहे पत्रात?
श्री. राजेंद्र कांचन यांनी हवेली तालुक्यातील सर्व प्रमुख सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि मान्यवरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की -
"गेली ३३ वर्षे मी सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि डी.जी.सी.च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. आपल्या भागातून सहकारातील अनुभवी व्यक्तीस संधी मिळावी, या हेतूने मी 'क' मतदार संघातून संचालक पदाची सेवा करण्यास इच्छुक आहे."
श्री. कांचन हे सध्या -
- संस्थापक अध्यक्ष - डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, उरुळी कांचन
- अध्यक्ष - श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट, हवेली (पुणे)
यांसह अनेक सहकारी संस्थांवर कार्यरत आहेत.
महत्वाची बैठक जाहीर -
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यासाठी त्यांनी सर्व सहकारी बांधवांची बैठक बोलावली आहे.
दिनांक: मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ११.०० वाजता
स्थळ: डॉ. मणिभाई देसाई सह. पतसंस्था, उरुळी कांचन येथील सभागृह
या बैठकीला श्री. दत्तात्रय काळभोर चेअरमन श्रद्धा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी काळभोर, सरपंच आणि तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
या बैठकीत निवडणुकीची रणनीती आणि सहकारातील पुढील वाटचालीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे 'क' मतदार संघातील निवडणूक आता चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
- गोदावरी टाइम्स | उरुळी कांचन प्रतिनिधी

Post a Comment
0 Comments